भारतीय बौद्ध महासभा नागभीडच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन
नागभीड : भारतीय बौध्द महासभा नागभीडच्या वतीने नागभीडचे तहसीलदारा मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. भारतातील बिहार राज्यात अस्तित्वात असलेले महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध धार्मियांचे पवित्र स्थान आहे.
. तथागत भगवान बुध्दाला याच ठिकाणी सत्य ज्ञानाचा मार्ग गवसला. भगवान बुद्धाने तेथे अनेक काळ वास्तव केले. त्या पवित्र व प्रेरणादायी भूमीवर सम्राट अशोकाने तेथे महाबोधी विहार बांधले. आणी ते बौद्धचे प्रेरणा स्थान म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. परंतु काही काळानंतर त्या बौद्धाच्या पवित्र स्तळावर वैदिक ब्राह्मनाणी कब्जा केलेला आहे. सदर स्तळ हे बौद्धाचे महाविहार असून ते तथागत भगवान बुद्धाच्या पावन वास्तव्याने मंगलमय झालेले आहे. त्यावर बौद्धांचा ताबा असायला पाहिजे. परंतु ते बुद्धाच्या विचार सरणीच्या विरुद्ध असलेल्या लोकांच्या ताब्यात आहे ही खेदाची व संतापजनक बाब आहे. त्या ठिकाणी देशोदेशीचे बौद्ध अभ्यासक, पर्यटक व बौद्ध अनुयायी येत असतात.
. सदर महाविहार बौद्धाच्या ताब्यात मिळावे म्हणून हजारो बुद्ध भिक्कू उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना भारतीय बौद्ध महासभेचा पाठींबा आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात मागण्या केल्या आहे त्यात महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे,बिहार सरकारने लागू केलेला बुद्ध मंदिर कायदा रद्द करावा, महाविहारात असलेल्या बुद्धाच्या मुर्त्यांना पाच पांडव संबोधन्यास बंदी आणावी., महाविहारात वैदिक पद्धतीने होणारे विधी त्वरित बंद करण्यात यावे. अशा पद्धतीचे निवेदन तहसीलदारा मार्फत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. निवेदन देताना शाम रामटेके, आर. डी. रामटेके, मनोहर रामटेके, प्रा. अनमोल शेंडे, केशव रामटेके, आनंद मेश्राम, सुरेश कोसे, राजकुमार मेश्राम, अमृत शेंडे, प्रभाकर करमरकर, प्रकाश वाकडे, खेमदेव गेडाम, माणिक डोहीतरे, जागेश्वर मुलमुले आणी इतर कारकर्ते उपस्थित होते.


