Home चंद्रपुर जिल्हा विशेष राजुरा पोलिस ठाणे श्वानपथका विना पोरका

राजुरा पोलिस ठाणे श्वानपथका विना पोरका

1107

राजुरा आस्थापनेच्या नावाने चंद्रपूर येथे असलेले श्वान पथक पूर्वरत राजुरा येथे आणण्याची मागणी

तपासात येतात अडचणी

राजुरा : पोलिस विभागाचे राजुरा येथील स्वतंत्र आस्थापना असलेले श्वान पथक कोणतेही सबळ कारण नसताना चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. यामुळे गुन्हे शोध, बाँब शोधक तपासामध्ये अडचण निर्माण होत आहे. राजुरा, गडचांदुर उपविभागात गुन्ह्याच्या शोधात तपास करताना श्वान पथकाला चंद्रपूर येथून बोलावून गुन्ह्याचा शोध घ्यावा लागत असल्याचे पर्यायाने तपासाला विलंब होत आहे.

.       राजुरा, गडचांदूर पोलीस उपविभागाअंतर्गत येत असलेले बहुतांश पोलिस ठाणे अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहे. या पोलिस ठाण्यात पुरेसे सशस्त्र पोलिस कार्यरत आहे. राजुरा उपविभागात १९८९ पासून श्वान पथकाचे स्वतंत्र आस्थापना आहे. यामध्ये प्रशिक्षित चार श्वान, एक पोलिस अधिकारी व नऊ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती या आस्थापनात करण्यात आल्या आहेत.

.    हे श्वान पथक पोलिस बांधवासोबत गुन्हे शोध, बॉम्ब शोध व आरोपीचा शोध घेण्यासाठी मदत करते. परंतु कोणतेही सबळ कारण नसताना काही अधिकाऱ्याच्या मनमर्जीने राजुरा येथील हे श्वान पथक चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. यामुळे राजुरा, गडचांदूर पोलिस उपविभागात काही अनुचित घटना घडली तर तात्काळ घटनास्थळी श्वान पथक पोहचणे अडचणीचे होत आहे. यामुळे शोध कार्यात विलंब होत आहे. राजुरा पोलिस उपविभागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहे. या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक अतिशय महत्त्वपूर्ण काम करते. राजुरा, गडचांदूर पोलीस उपविभागामध्ये जवळपास २० ते २५ पोलिस ठाणे येतात.

.      या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये केव्हाही अनुचित घटना घडू शकतात. त्यासाठी राजुरा श्वान पथक मुख्यालयी तैनात असणे आवश्यक आहे. मात्र, राजुरा आस्थापनेच्या नावाने चंद्रपूर येथे असलेले श्वान पथक राजुरा उपविभागातील गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहचण्यासाठी उशीर होत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यास विलंब होत असतो.

error: Content is protected !!