Home चंद्रपुर जिल्हा विशेष कामगार महिलेला कंत्राटदाराकडून रात्री बेरात्री फोन

कामगार महिलेला कंत्राटदाराकडून रात्री बेरात्री फोन

1111

घुग्घुस पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल

चंद्रपूर : घुग्घुस येथील मेटल्स कंपनीत तीन वर्षांपासून मजुरीचे काम करणाऱ्या ३० वर्षीय महिलेला रात्री बेरात्री केव्हाही फोन करून पैशाचे आमिष दाखवत वारंवार फोन करणाऱ्या कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून पिडीत महिलेने अखेर घुग्घुस पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सदर कंत्राटदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. करण कोहली असे आरोपी कंत्राटदाराचे नाव आहे.

.     घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स या कंपनीत के. बी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईच्या मालकाचा मुलगा करण कोहली हा
लॉयड्स मेटल्स घुग्घुसमध्ये कंत्राटदार आहेकामावर लक्ष ठेवतो. पीडित महिला ही लॉयइस मेटल्स कंपनीत तीन वर्षांपासून मजुरीचे काम करते व ती घरी एकटीच राहत होती. के. बी. कन्स्ट्रक्शन कंपनी मुंबईच्या मालकाचा मुलगा करण कोहली चा व पीडित महिलेचा कामानिमित्त त्याच्याशी संपर्क येत होता. नोव्हेंबर २०२४ पासून तो पीडित महिलेला भ्रमणध्वनीवर रात्री बेरात्री केव्हाही फोन करायचा आणि पैशाचे आमिष दाखवत होता. वारंवार येणाऱ्या फोनमुळे त्रस्त झाल्याने २४ फेब्रुवारीला घुग्घुस पोलिस ठाण्यात त्या कंत्राटदार आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटदाराविरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ कलम २०२३, ७५ व ३ (२) (विए) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव पुढील तपास करीत आहे.

error: Content is protected !!