काजळसर येथील घटना
दारू विक्रेत्याला केले पोलिसांच्या स्वाधीन
नेरी : चिमुर तालुक्यातील काजळसर येथील दारू बंदी समितीच्या महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला मुद्देमाल सहित पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
. चिमूर तालुक्यातील काजळसर येथे अवैध दारूविक्रीचा महापूर सुरू असून पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतात. अखेर महिलांनी पुढाकार घेत आहे. मात्र पोलीस प्रशासनाची साथ मिळत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. सिद्धार्थ निकोडे हा अवैध दारू विक्रेता खुलेआम दारू विकत होता. गावात कार्यक्रम असल्याने पुरुष मंडळी दारू पिऊन मजा मारीत होते. आणि कुटूंबातील महिलांची सजा होत होती. या प्रकरणी महिलांनी पोलिसांना कळविले. मात्र दुर्लक्ष होत असल्याने कंटाळून महिलांनी पोलीस मदत कक्ष 112 वर फोन केला तात्काळ चिमूर पोलीस काजळसर येथे दाखल झाले. पोलिस येताच महिलांनी अवैध दारू विक्रते सिध्दार्थ निकोडे याला मुद्देमाल सहित पकडून पोलिसांच्या तांब्यात दिलेमुद्देमाल हा अंदाजे पाच हजार रुपये किमतीचा असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी दारूबंदी अध्यक्ष चंदा सरवरे व समितीच्या सर्व सदस्य पदाधिकारी आणि गावातील महिला मंडळींनी पुढाकार घेतला.


