विजय वानखेडे यांचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भद्रावती : येथील तहसील कार्यालयातील विविध संवर्गातील अनेक पदे रिक्त असून या रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांकडे अधिक कार्यभार देण्यात आला असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची दैनंदिन कामाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत होऊन कामे विविध कालावधीत पूर्ण होत नसल्यामुळे रिक्त पदांचा तात्काळ भरणा करावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांमार्फत दिलेल्या निवेदनातून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय वानखेडे यांनी केली आहे.
. भद्रावती तहसील कार्यालयातील महसूल विभागाशी संबंधित सहा ते सात व अन्न पुरवठा विभागाशी संबंधित चार ते पाच असे एकूण विविध संवर्गातील 10 ते 12 पदे रिक्त असून या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कर्मचाऱ्यांकडे देण्यात येत असल्यामुळे जनतेच्या दैनंदिन कामाचे नियोजन विस्कळीत होऊन विविध कालावधीत कामे पूर्ण होत नसल्याचे निवेदनातून वानखेडे यांनी म्हटले असून सर्वसामान्य गरीब जनतेची त्यांच्या आवश्यक महत्त्वाच्या कामाकरिता महसूल विभागाशी नाळ जोडलेली असून शेतकऱ्यांचे संबंधित, शेतीच्या रस्त्या संबंधित, शालेय कामे, स्वस्त धान्य पुरवठा व रेशन कार्ड संबंधित तसेच इतर कामे वेळेवर होण्याचे दृष्टीने येतील विविध संवर्गातील रिक्त पदे नायब तहसीलदार अव्वल कारकून, महसूल सहाय्यक व शिपाई असे दहा ते बारा पदे रिक्त असून तात्काळ भरणा करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा करावा अशी मागणीही निवेदनातून केली असून या निवेदनावर त्वरित सकारात्मक कारवाई न झाल्यास भाजप तर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही विजय वानखेडे यांनी यातून दिला आहे.


