Home चंद्रपुर जिल्हा विशेष जुगार अड्डयावर नागभीड पोलीसांची धाड

जुगार अड्डयावर नागभीड पोलीसांची धाड

1100

4 अटकेत 9 आरोपी फरार

2 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त

नागभीड : तालुक्यातील बोन्ड राजोली शेत शिवारातील झुडपी जंगलात अवैधरित्या जुगार खेळ सुरु असल्याची गुप्त माहिती नागभीड पोलिसांना मिळताच जुगार अड्डयावर धाड टाकून 4 आरोपीना अटक करण्यात आली मात्र 9 आरोपी पसार झाले असून घटनास्थळावरून 2 लाख 76 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

.      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोन्ड येथील शेतशिवारालगत असलेल्या झूडपी जंगलात काही व्यक्ती जुगार खेडत असल्याची गुप्त माहिती नागभीड पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे 52 पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळ खेळीत असलेल्या इसमावर धाड टाकून आरोपी राजू दामोधर घोटेकर, शिवराम नकटु कुकसे, प्रमोद मुरारी पचारे, गिरीधर प्रभाकर कुळे हे जुगार खेळताना मिळून आले तर काही आरोपी फरार झाले. फरार आरोपीत राजेश देशमुख बोन्ड, रुपेश घोटेकर,) गणेश भानारकर,) मुन्ना राऊत, धनरीज जिवतोडे) भगवान डहारे,गणेश मगरे, संपत ठाकरे, पुरषोत्तम वालदे यांचा समावेश आहे घटना स्थळावरून काळ्या रंगाची तळपात्री, 52 पत्ते व जुगारावर लावलेले नगदी रुपये 2300/- तसेच आरोपीची अंग झडती घेतली असता नगदी रुपये 16 हजार 130 रुपये मिळाले. यात मोटारसायकल हिरो होंडा MH34-AJ1364, बजाज डिसकव्हर MH34-SQ5894, होंडा शाईन MH34-CE4917, बजाज डिसकव्हर MH34-AG7427, बजाज पल्सर MH19-BD4440असा एकूण 2 लाख 76 हजार 810 रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नागभीड येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमां नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

. सदरची कामगिरी उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजिक्य गोविंदलवार, पोलीस हवालदार रुपेश मुल्लावर, कुणाल पतरंगे, अशोक लेनगुरे, दिलीप चौधरी, मेगशाम गायकवाड, विशाल पेंदाम पो. स्टे. नागभीड यांनी केली आहे.

error: Content is protected !!