माजरी : भद्रावती तालुक्यातील माजरी येथील सदानंदम दासारपु यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा भद्रावती तालुका महामंत्रीपदी निवड करण्यात आली.
. भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष उमेश बोढेकर यांच्या नेतृत्वात सदानंदम दासारपु यांची निवड करण्यात आली. जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान भाजप कामगार मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष उमेश बोढेकर यांनी सदानंदम दासारपु यांना भद्रावती तालुका महामंत्री पदाचे नियुक्ती पत्र प्रदान केले. स्थानिक खाजगी कंपनीतील कामगारांना अधिक दृढ करण्यासाठी सदानंदम दासारपु साह्यभूत ठरणार आहेत. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचा व सामाजिक कार्याचा अनुभवाचा फायदा व्हावा व त्यांना कामगार मोर्चाच्या संघटनेत सर्वार्थाने सक्रीय करण्यासाठी महामंत्रीपद देण्यात आल्याचे समजते. नियुक्तीनंतर सदानंदम दासारपु यांनी पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला तो येत्या काळात सार्थ ठरवू तसेच भाजप कामगार मोर्चा तालुक्यातील सर्व कामगारांना न्याय देण्याचे काम करू, असा विश्वास व्यक्त केला. सदानंदम यांच्या नियुक्तीने माजरीसह तालुक्यातील मान्यवर मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.


