Home चंद्रपुर जिल्हा विशेष रॉंग साईड येणाऱ्या ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक

रॉंग साईड येणाऱ्या ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक

1086

दुचाकीस्वार ठार

वरोरा – वणी महामार्गावरील घटना

कुचना : वरोरा कडून वणीकडे जात असलेल्या दुचाकीला रॉंग साईडने येत असलेल्या ट्रक ने समोरासमोर जबर धडक दिली. ही घटना वरोरा – वणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास पाटाळा फाट्याजवळील ओव्हेरब्रिजवर घडली. या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गिरीष अशोक ढवस (२३) रा मोकाशी ले आउट वरोरा असे मृतक दुचाकीस्वाराचे नाव आहे.

.    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वरोरा शहरातील मोकाशे ले -आऊट येथील रहिवासी गिरीष अशोक ढवस हे काही कामासाठी आपल्या दुचाकीने रविवारी सकाळी वरोराकडून वणीकडे जात होते. दरम्यान वरोरा – वणी महामार्गावर पाटाळा फाट्याजवळील ओव्हरब्रिजवर त्यांच्या दुचाकीस रॉग साईडने येणाऱ्या ट्रक क्र. एम एच ३४ बीजी ७००१ या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात गिरीष हा गंभीर जख्मी झाला. दरम्यान घटनास्थळी उपस्थित लोकांनी शेंबळ टोल नाक्यावर माहिती दिली घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल होवून जखमी दुचाकीस्वार गिरीष ढवस याला उपचारासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान गिरीषचा मृत्यू झाला.

.     अपघात करून आरोपी ट्रक चालक ट्रक घेवून वरोराकडे जात असताना माजरी पोलीस दलातील ट्रॅफिक पोलीस एकनाथ बोरकुटे यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून वरोरा येथील शगुन लॉन समोरील रस्त्यावर सदर ट्रकला अडविला. आणि ट्रक ताब्यात घेवून माजरी पोलीस ठाण्यात जमा केला. आणि आरोपी चालक राजकुमार दशरथ कैथल याच्या विरुद्ध माजरी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकारणी पुढील तपास माजरी येथील ठाणेदार अमितकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली माजरी पोलीस करीत आहे.

सीसीटीव्ही कँमेरे ‘फक्त टोल वसुलीसाठी                                                                                                                                       सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत आवश्यक देखरेख प्रदान करतात. त्यामुळे वरोरा -वणी महामार्गावरील महत्वाच्या ठिकाणी, जसे की पाटाळा फाट्यावर ओव्हेरब्रिजच्या लेनमध्ये वाहतूक व्यवस्थापन, देखरेख आणि सुरक्षिततेसाठी हाय-रिझोल्यूशन नाईट-व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची अत्यंत गरज असतानादेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI ) यांनी याकडे दुर्लक्ष केले. पाटाळा फाट्याजवळील ओव्हरब्रिजवर सीसीटीव्ही कॕमेरे नसल्यामुळे या महामार्गावर अपघात करून वाहन चालक पसार होण्यास यशस्वी होत आहे.

error: Content is protected !!