नागभीड पोलीसांची कारवाई
7 लाखाचा मुद्देमाल जप्त
नागभीड : तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे. त्यासाठी मोठी पुजापाठ करावी लागणार. पूजापाठ केल्यानंतर मुलांचा जीव वाचणार अशी भीती दाखवून तब्बल 7 लाख 38 हजार सहाशे रुपयाचा चुना लावणार्या “त्या” चार भोंदू फकिरांना पोलिसांनी बेळ्या घालत जेरबंद केले असून त्या फकिराकडून 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नागभीड पोलिसांना यश आले.
. पोलिस सूत्रानुसार नागभीड तालुक्यातील पाहर्णी येथील नकटु मोतीराम सतिमेश्राम (55) यांच्या घरी 20 जानेवारी ला चार भोंदू फकीर आले. दरम्यान त्यांनी नकटू यांना संगितले की, तुमच्या मुलाच्या जिवीतास धोका आहे. त्याकरीता पुजापाठ करुन पुन्हा मोठी पुजापाठ करण्याची भीती दाखविली. त्यामुळे नकटू घाबरला. याचाच फायदा घेत पुजाअर्चा करण्यासाठी पैशाची मागणी केली. घाबरलेल्या नकटूने एकुण नगदी 7 लाख 38 हजार सहाशे रुपये त्या भोंदू फकिरांना दिले. मात्र पैसे घेऊन फकिरांने पोबारा केला. हे लक्षात येताच आपली आर्थीक फसवणुक झाली असल्याचे लक्षात येताच नकटु मोतीराम सतिमेश्राम यांनी पोलीस स्टेशन नागभीड येथे दि. 1 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. नागभीड पोलिसांनी याची दखल घेत त्या चारही भोंदू फकिरां विरुद्ध अपराध क्र 32/2025 कलम 318(4), 3 (5) भारतीय न्याय संहीता सण 2023 अन्वये गुन्हा नोद करुन तपास सुरू केला.
. पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, उपविभाग ब्रम्हपुरी, रमाकांत कोकाटे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन नागभीड यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पोटभरे पो.स्टे. नागभीड यानी गुन्हयाचा अतिशय चानाक्ष पणे तपास करुन गुन्हयातील आरोपी पवन शत्रुन्न गुजर (21), कापसु श्रावण पांचगे (50), गजानन शत्रुघ्न गुजर (35) तिन्ही राहणार रा. खापरीराजा, कुही फाटा ता.उमरेड जि. नागपुर, परमेश्वर उर्फ देवा पिसाराम एकनाथ (34) रा. सेलु, ता. कळमेश्वर जि. नागपुर यांचा शोध घेवुन त्याना अटक केली. अटक आरोपीकडुन फिर्यादीची फसवणुक केलेली रक्कम 6,50,000/- रु हस्तगत करुन आरोपीनी गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, चारचाकी वाहण जप्त केले आहे. सदरची कामगिरी पो. हवा. रुपेश मुल्लेमवार, पो.अं. अजित शेन्डे, पो.अं. रोहीत तुमसरे, पो.अं. मेघश्याम गायकवाड यानी केली.
. फसवेगिरी करणाऱ्या लोकापासुन सावध राहण्याचे आव्हान प्रभारी अधिकारी रमाकांत कोकाटे, पोलीस स्टेशन नागभीड यानी जनतेला केले आहे.


