गडचांदूर : शोतोकाण कराटे डू असोसिएशन ऑफ इंडियाव्दारे आयोजित आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पंजाब राज्यातील अमृतसर येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत विविध देशातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
. त्यास्पर्धेत आदित्य बिर्ला पब्लिक स्कुल, गडचांदूरचे अर्णव लोखंडे ( सिल्वर, ब्राँझ ) सर्वेश राऊत ( सिल्वर, ब्रॉंझ ) मयंक शर्मा (२ ब्रॉंझ) प्रदूमान सिंह (२ सिल्वर) प्रत्युश सिंह (गोल्ड, सिल्वर) मनीष प्रजापती (२ ब्रॉंझ) दर्श लसंते (सिल्व्हर, ब्रॉंझ) अरबाज सिंह (२ ब्रॉंझ) गौरी खडसे (२ सिल्व्हर) प्रियंका राज (२ ब्रॉंझ) या विद्यार्थ्यांनी पदके क्रीडा शिक्षिका सिंधू कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केलेली आहे. त्यांच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य डॉ. सी. आर. के. मोहन यांचेसह शाळेच्या शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.


