वरोरा तालुक्यात पोल उभारले
किशोर डुकरे
वरोरा : नागपूर येथून सुरु झालेला समृद्धी महामार्ग वर्धा -चंद्रपूर जिल्हा मधून आंध्रप्रदेश मधील विजयवाडा येथे जाणार आहे या मार्गाची वर्धा जिल्हातील शेतातील आखनी झाली असून आता ती चंद्रपूर जिल्हा मधील वरोरा तालुक्यातील पाचगाव, आसाळा, बोरगाव परिसरात सिमेंट पोल गाडून आखनी जोमात सुरु झाली आहे.
. नागपूर विजयवाडा एक्सप्रेसवे हा ५७७ किमी लांबीचा आणि चार पदरी, अर्ध-प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे आहे जो महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून जाईल. नागपूर विजयवाडा एक्सप्रेसवे हा भारतमाला परियोजनेअंतर्गत एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश देशभरातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारणे आहे. हा एक्सप्रेसवे एक हाय-स्पीड कॉरिडॉर आहे जो मध्य आणि दक्षिण भारतादरम्यान वस्तू आणि लोकांची जलद हालचाल सुलभ करतो. हा महामार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती आणि बल्लारपूर तालुक्यातून जाणार आहे.
. या नवीन होणाऱ्या मार्गा मुळे कित्येक शेतकरी भूमिहीन होणार आहे त्यामुळे जरी शेतकऱ्यांना पैसे मिळणार असून आम्ही पैसे खाणार काय अशी चर्चा परिसरातील शेतकरी करीत आहे, वाढती लोकसंख्या बघता शेतकरी अल्प भूधारक झाला आहे. तो या जमिनीवर आपले कुटुंब कसेबसे अनाज पिकवून पोटभर अन्न पिकवत होता मात्र आज या मार्गाने पोटचा खास हिरवल्या सारखे झाले त्यामुळे या मार्गाला शेतकरी पसंती देईल का? असे बोलल्या जात आहे.
माझ्या शेतातून सदर मार्ग जात असून या मार्गाची रुंदी 100 मीटर आहे. माझे शेत जवळपास 200 मीटर आहे. माझ्या शेताचे दोन तुकडे झाले आहे. ते सरकारने पूर्ण घेण्याचे करावे तसेच दिवसेंदिवस जमिनी मिळत नसल्याने आमचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न माझ्या समोर उभा आहे, सरकारने आम्हाला या जमिनीच्या मोबदल्यात दुसरी कडे जमिनी उपलब्ध करून योग्य तो मोबदला द्यावा.
अनंता भाऊराव आसुटकर, शेतकरी, आसाळा


