Home सामाजिक कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाला बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाला बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

1139

माजरी : कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माजरी येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.      या कार्यक्रमाला ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा चे संचालक उत्तम झाडे, कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य संतोष चौखे, प्रा. हरिदास वैद्य, प्रा. प्रमोद कोल्हे, प्रा. माहेश्वरी निंबाळकर, अपर्णा सुंकरवार, प्रविण लांडगे, गुलाब श्रीरामे, विनोद हिवरकर, ज्योती तावाडे, राजेश चहांदेसर, निलीमा गेडाम, कन्नाके आणि राहुल ढोके उपस्थित होते.

.      यावेळी सनया इंगोले, संजना कैथल, माहेनूर सिद्दीकी, सनया सोनारकर, अंशू सिंग, समीक्षा ढवस या विद्यार्थीनी शिक्षका विषयी असलेले प्रेम, आदर आणि कनिष्ठ महाविद्यालयाला सोडून जाण्याचे दुख व्यक्त केले. शिक्षकांनी विद्यार्थी प्रती असलेले कर्तव्य प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी खंगार, प्रास्ताविक माहेश्वरी दिवाकर निंबाळकर यांनी तर आभार मानसी मते यांनी मानले.

error: Content is protected !!