Home चंद्रपुर जिल्हा विशेष गडबोरीत १५ दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ

गडबोरीत १५ दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ

1145

शेळ्यांवर मारला ताव

गावात दहशत

कर्फ्यु सदृश्य परिस्थिती

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील गडबोरी या गावात मागील १५ दिवसापासून बिबट्याचे बस्तान असून दररोज कोंबड्या बकऱ्या यांचेवर बिबट्या ताव मारत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या दहशतीने सायंकाळी ७ वाजता गावातील कोणताही नागरिक घराबाहेर पडत नसल्याने गावात कर्फ्यु लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वनविभागाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

.    गडबोरी या गावाची भौगोलिक रचना ही गावासभोवताल असलेल्या टेकड्याचे खाली वसलेले असून बिबट्या सारख्या जंगली प्राण्यांना वावरण्यासाठी मुबलक जागा मिळत आहे. तसेच बिबट्या हा प्राणी कोणतीही मोठी शिकार करीत नसल्याने कोंबड्या, बकऱ्या, यांचेवर ताव मारत आहे. तसेच दररोज सायंकाळी गावाशेजारी येऊन आरडाओरड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून फटाके फोडण्याचे थातुर मातुर प्रयत्न होत असले तरी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. आता पर्यंत बिबट्याने अनेक नागरिकांच्या गोठ्यात, घरात घुसून बकऱ्या, कोंबड्या, यांना ठार केले असल्याने अनेक गरीब नागरिकांची आर्थिक नुकसान झालेली आहे. काल नामदेव पेंदाम यांचे घरात घुसून शेळी ठार केली असल्याने बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. परिणामी गावात भीतीचे वातावरण पसरले असून सायंकाळी ७ वाजताच्या नंतर कोणतेच नागरिक घराच्या बाहेर पडत नसल्याने गावात कर्फ्यु लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा तात्काळ कायमचा बंदोबस्त करावा.. अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

error: Content is protected !!