Home चंद्रपुर जिल्हा विशेष वाघाने केला ट्रॅक्टरचा पाठलाग

वाघाने केला ट्रॅक्टरचा पाठलाग

1116

सिरपूर टेकडी परीसरातील शेतशिवरातील घटना

ट्रॅक्टर चालक व शेतकर्‍यांनी अनुभवला थरार

नेरी : दिवसभर महिलांनी शेतात कापूस वेचला. सायंकाळी शेतमालक वेचलेल्या कापसाचे गाठोळे आणण्यासाठी ट्रॅक्टरने शेतात गेला. ट्रॅक्टर शेतात पोहचताच शेतात दडून बसलेल्या वाघाने अचानक ट्रॅक्टरच्या इंजिनवर झेप घेतली. घाबरलेल्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर घेऊन घुम ठोकली. तर चक्क वाघाने या ट्रॅक्टरचा पाठलाग केल्याचा थरार सिरपूर च्या टेकडी परिसरातील टिकाराम पिसे यांच्या  शेतात दि 31 जाने ला सायंकाळी 5.30 वाजता घडली.

.    सिरपूर पहाडी परिसरात नेहमीच मोठया पट्टेदार वाघाचा वावर असून आतापर्यंत या शेतशिवारात अनेकांना दर्शन दिले आहे. मात्र अनुचित घटना घडली नाही सदर वाघ मागील दोन महिन्यांपासून या परिसरात वावरत असल्याचे नागरिक बोलीत आहेत मात्र शुक्रवारला टिकाराम पिसे यांच्या शेतात महिला मजूर कापूस काढण्यासाठी गेले असता त्यांना सायंकाळ च्या सुमारास वाघाची डळकाळी ऐकू आली त्यामुळे त्यांनी शेतातून कापूस ठेवून पलायन केले सदर ठिकाणी वाघाचा वावर असतो याची माहिती त्यांना मिळाली होती त्यामुळे त्या सर्व सात महिला मजूर दहशतीत काम करीत होत्या सदर कापूस आणायला शेतमालकाने ट्रकटर पाठविले असता शेतात आधीच दबा धरून असलेल्या वाघाने ट्रकटर वर हल्ला चढविला अचानक हल्ल्याने चालक व शेतगडी घाबरले मात्र प्रसांगवधान राखून आरडाओरडा करीत ट्रकटर चालूच ठेवले मात्र वाघ ट्रकटर चा पाठलाग करीत होता जेव्हा शेतातून बाहेर येताच वाघाने पिच्छा सोडला सदर घटनेची माहिती शेतमालक यांना देताच त्यांनी नेरी क्षेत्राचे वनपरिक्षेत्र क्षेत्रासाहायक अधिकारी रासेकर यांना भ्रमणध्वनी वरून माहिती देताच त्यांनी या बाबीची दखल घेत सकाळी परिसरात जाऊन पाहणी करीत गस्त केली सदर वाघामूळे शेतातील कामे खोळंबली असून शेतात काम करायला भीती निर्माण झाली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत तेव्हा वनविभागाने सदर वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी टिकाराम पिसे सह अनेक शेतकरी वर्गांनी केली आहे अन्यथा वनविभागा विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!