अतिक्रमण कारवाईत 4 कुटुंब रस्त्यावर
नेरी येथील प्रकार
नेरी : येथील पीएचसी चौकात 27 जानेवारीला अतिक्रमण धारकांवर ग्रामपंचायतीने बुलडोजर चालवीला. यात अनेकांच्या घराची तोडफोड करण्यात आली. यात बेघर झालेल्या 4 कुटुंबानी थेट ग्रामपंचायत इमारतीत संसार थाटला. जोपर्यंत राहण्यासाठी जागा मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत मध्येच मुक्काम ठोकणार असल्याची भुमिका घेतल्याने आता ग्रामपंचायत समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
. गावाच्या विकासासाठी व चौकातील सौदर्यीकरण तसेच अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमनावर बुलडोजर चालवून अतिक्रमण हटाव मोहीम ग्रामपंचायत नेरी कडून राबविली गेली यात अनेक व्यवसायिकांचे दुकान तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले घर बुलडोजर चालवून कायदेशीर कारवाई केली मात्र घर उद्धवस्त झालेल्या कुटूंबियांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी ग्रा प कार्यालयाच्या आवारात संसार थाटले असून जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत इथेच तळ ठोकून उघड्यावर राहणार असून ही धरणी आमची माय आणि आभाळ आमचा बाप अशी टोकाची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.
. ग्रा प कार्यालयाने अतिक्रमण धारकांना सूचना तसेच नोटीस देऊन अतिक्रमण उचलावे आणि आपली व्यवस्था करावी असे बजावले होते काहींनी आपले दुकान उचलले मात्र अनेकांनी उचलले नाही तेव्हा पोलीस प्रशासनाला पाचारण करून चोख बंदोबस्तात अतिक्रमण हटवले असून सदर अतिक्रमण धारकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या जाईल असे आश्वासन दिले मात्र घर हटवलेल्या कुटूंबियांना त्यांची जागा गावात उपलब्ध असल्याचे ग्रा प वतीने सांगण्यात आले आहे पण आम्हाला निवारा उपलब्ध करून द्या ही मागणी घेऊन काही कुटूंबीयांनी ग्रा प कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे असे चार कुटूंब ग्रामपंचायत मध्ये वास्तव्यास आहेत अनेकांनी त्यांची मनधरणी करून आपल्या गावातील घरी जावे असे सांगितले तरीसुद्धा आम्ही जाणार नाही अशी भूमिका कुटूंबियांनी घेतली आहे आम्हाला घर हवे आणि जागा उपलब्ध करून देऊन ग्रामपंचायतीने ते बांधून द्यावे असे कुटुंबियांची मागणी आहे जोपर्यंत सदर मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत याच कार्यालयातील परिसरात राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
गावाच्या विकासासाठी कारवाई सुरूच राहणार सदर अतिक्रमीत धारकांना गावात घर उपलब्ध आहे, तसेच बाहेरगावातील अतिक्रम धारकाकडे सुद्धा घर उपलब्ध आहेत मात्र हेतुपुरस्सर ग्रा प च्या आवारात निवारा घेऊन लोकांना दाखवीत आहेत व बेकायदेशीर वास्तव्य करीत आहेत आणि अतिक्रमणाच्या कारवाईत ग्रा प ला अडथळा निर्माण करीत आहेत गावाच्या विकासासाठी सदर कारवाई सुरूच राहणार. रेखा पिसे, सरपंच, ग्रामपंचायत नेरी


