Home सामाजिक खडसंगी येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

खडसंगी येथे संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव

1099

चिमूर : तालुक्यातील खडसंगी येथील संताजी तेली समाज बहुउद्देशीय मंडळाचा वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांचा ४०० वा पुण्यतिथी महोत्सव, समाज प्रबोधन व मार्गदर्शन सोहळा दि.१ व २ फेब्रुवारी ला मानिकादेवी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

.     या कार्यक्रमाची सुरुवात दि.१ शनिवार ला ग्रामसफाई ने होणार असून सकाळी १० वा घटस्थापना व भजन, बाल संस्कार कॉन्व्हेन्ट चा महिलाचां हळदी कुंकू कार्यक्रम सायं. ६ वाजता गावातील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दि.२ रविवारला सकाळी ७.३० वाजता संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व शोायात्रा दुपारी १२  वाजता प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन व सत्कार होणार आहे.या प्रसंगी अध्यक्ष स्थानी विदर्भ तेली समाजाचे प्रशांत कामडे, सत्कारमूर्ती आमदार किर्तिकुमार भांगडीया तर प्रमुख अतिथी म्हणून विठल निकुरे,धनराज मुंगले, गजानन भजभुजे, डी.के. निकूरे,अभिनय लाकडे,सरपंच प्रियंका कोलते आदि उपस्थित असणार आहेत.

.    दुपारी ४ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,सायं ५ वाजता महाप्रसाद वाजतरी परिसरातील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. संताजी तेली समाज बहुउद्देशीय मंडळ खडसंगी द्वारे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!