चिमुर पोलिसांची कारवाई
नेरी : चिमूर तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले असून रेती तस्करीमुळे आतापर्यंत 4 बळी गेल्याने पोलीस विभाग ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. नेरी जवळील हरणी घाटावर रेती भरण्यासाठी जाणाऱ्या चार ट्रॅक्टर चिमुर पोलिसांनी पकडून कारवाई केल्याने रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
. चिमूर तालुक्यात रेती तस्करी वाढली असून यावर महसूल विभाग नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला आहे तस्करांशी साठगाठ असल्याने रेती तस्करी जोमात आणि महसूल विभाग कोमात असे नागरिक चवीने चर्चा करताना दिसतात मागील एका महिन्यात रेती तस्करी करताना ट्रॅक्टर वरून पडून एकाचा तर ट्रॅक्टर ट्राली पलटून एकाचा असे दोन जणांचे दुर्दैवी मृत्यू झाले मात्र तरीसुद्धा तस्कर हे रेतीची तस्करी सोडताना दिसत नाहीत पुन्हा जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहेत यांना कुणाचे पाठबळ आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे? सदर कारवाई ही ठाणेदार बाकल यांनी ट्रॅक्टर चे नंबर आणि चालकाचा परवाना तपासणी करीता कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. चारही ट्रॅक्टर जप्त करून ठाण्यात रवानगी केली आहे. सदर ट्रॅक्टर हे हरणी नदी घाटावरून रेतीची तस्करीसाठी गेले होते. मात्र पोलिसांच्या मध्येच कारवाईने त्यांचा बेत फसला अशी माहिती आहे. सदर ट्रॅक्टर गजेंद्र राऊत चिमूर, तेजस शिरभय्ये वडाळा, प्रशांत कोडापे नेरी, राहुल ढोणे नेरी यांच्या मालकीचे आहे.


