खानगाव येथील नागदिवाळी महोत्सव व गुणवंताचा सत्कार
चिमूर : आदिवासी समाजाने आपल्या संविधानिक हक्क व अधिकारा बाबत जागरूक राहावे , उच्च शिक्षण व आरक्षणाच्या माध्यमातून आपला विकास करावा, आदिवासींना त्यांचे अधिकार व न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अॅड. अनंता रामटेके यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम विषयी मार्गदर्शन करताना केले. ते चिमुर तालुक्यातील खानगाव येथे दोन दिवसीय नागदिवाळी महोत्सव कार्यक्रम दरम्यान बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन माना आदिम जमात मंडळ मुंबई शाखा खानगाव च्या वतीने करण्यात आले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन विजयकुमार घरत यांनी केले, सुधाकर जी चौखे प्रा.डॉ. दिनकर चौधरी मार्गदर्शक, गुरुदेव नन्नावरे अध्यक्ष तर ऍड. अनंता रामटेके मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव कारमेंगे तर संचालन रवी चौखे यांनी केले.


