Home चंद्रपुर जिल्हा विशेष मैत्रिणी सोबत असलेल्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटले

मैत्रिणी सोबत असलेल्या युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटले

1151

महाकाली नगरीतील घटना 

दोन जणांना अटक

चंद्रपुर : चंद्रपूर नागपूर महामार्गावरील नंदोरी येथील महाकाली नगरी येथे एक युवक आपल्या मैत्रिणी सोबत बसला होता. अचानक दोघे जण पल्सर बाईकने तिथे आले. आणि पोटाजवळ चाकू लावून खिशातील व ऑनलाईन फोन पे ने पैसे उखळल्याचा अफलातून प्रकार नंदोरी येथील महाकाली नगरीत 18 जानेवारी रोजी दुपारी 3.40 वाजताच्या सुमारास घडली.

.      वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी येथील टोल नाका जवळ महाकाली नगरी नावाने ले-आऊट आहे. या ले आऊट मध्ये एका झाडा खाली निखिल तुराणकर हा मैत्रिणी सोबत गप्पा मारीत बसला होता. दरम्यान काही वेळाने तिथे एक काळ्या रंगाची बजाज पल्सर मोटार सायकल वरुन दोन युवक त्यांच्या जवळ येवुन थांबले. व निखिल चे कॉलर पकडुन  दोन थापडा मारल्या व जबरदस्तीने  खीशातील 1800 रुपये काढून घेतले. या प्रकारामुळे दोघेही घाबरले. व मदतीसाठी आरडाओरड करू लागले. तर याच महाकाली नगरीत काही प्रेमीयुगल बसले होते. मात्र जिवाच्या आकांताने ते पळून गेले. त्यांनी आणखी पैश्याची मागणी केली परंतु निखिल कडे पा पेक्षा जास्त पैसे नसल्याचे सांगीतल्याने त्यांना आम्ही पैसे लपवित आहे असे वाटले म्हणून एकाने दुसर्‍याला गोलु त्याला मागून पकड कसा पैसे देत नाही ते मी बघतो असे म्हणून त्यांनी पल्सर गाडीत ठेवलेला धारदार हत्यार आणून निखिल च्या  पोटाला लावल्याने निखिल घाबरला. त्यांना पैसे नाही दिले तर ते आम्हा दोघांचा जिव घेणार असे वाटत होते. त्यामुळे निखिल ने त्या दोघांना रोख पैसे नसल्यामुळे फोन पे वरुन 5 हजार रुपये ट्रान्सफर केले. अशी तक्रार निखिल ने वरोरा पोलिसात दाखल केली.

क्युआर कोड वरील नावाने आरोपी अडकला                                                                                                                                     निर्जनस्थळी बसलेल्या मित्र मैत्रिणीला लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन युवकांनी दमदाटी करत खिशातील रोख रक्कम काढून घेतली. तर आणखी पैसे मिळविण्यासाठी चाकूचा धाक दाखवून त्यांना घाबरवित चक्क युवकाकडून फोन पे ने क्युआर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पैसे वसूल केले. मात्र इथेच त्यांचा डाव फसला. आणि अलगत वरोरा पोलीसांच्या जाळ्यात फसले. वरोरा पोलीसांच्या गुन्हे शोध पथकांनी 24 तासांच्या आतच आरोपीचा शोध घेत जेरबंद केले. सूरज बालाजी गोहणे व गोलू पाझारे या दोन्ही आरोपींना अटक केली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. 

महाकाली नगरी प्रेमी युगलांचा अड्डा                                                                                                                                              वरोरा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर महाकाली नगरी नावाची लेआऊट आहे. सदर लेआऊट अविकसित असल्याने येथे मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहे. याचाच फायदा घेत शाळकरी व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी येत प्रेमाचे चाळे करतांना दिसूत येत आहे. यामुळे महाकाली नगरी प्रेमी युगलांचा अड्डा बनल्याचे बोलल्या जात आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक प्रेमीयुगलांना लुटण्याचे प्रकार घडले आहे. मात्र घरच्यांना माहिती होणार म्हणून कोणीही आज पर्यंत पुढाकार घेत पोलीसात गेले नाही. शनिवारी ऑनलाईन पद्धतीने लूटमार झाल्याच्या प्रकारामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात फसले आहे.

error: Content is protected !!