Home सामाजिक आनंदनिकेतन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न

आनंदनिकेतन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संपन्न

1170

वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर नुकतीच ग्रामपंचायत पारोधी, तालुका भद्रावती इथे संपन्न झाले. प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ व समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले होते.

.        समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंदनिकेतन महाविद्यालयातील गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन समितीच्या डॉ. रंजना लाड व पारोधी गावातील ज्येष्ठ नागरिक दामोदर बोबडे  उपस्थित होते. यात मतदार जनजागृती, प्लास्टिक व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनासाठी युवाशक्ती शिबिर”ही या शिबिराची थीम ठरवण्यात आली होती. या अनुषंगाने सात दिवस चाललेल्या या शिबिरात यावर्षीच्या थीमला अनुसरूनच बौद्धिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर येथील अनुसया काळे आणि टीम यांच्या प्लास्टिक व्यवस्थापन व मुजावर अली व रोशन इरपाते यांचे सायबर क्राईम व मोबाईलचे दुष्परिणाम या लेक्चर्सना रासेयो स्वयंसेवकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मतदार नोंदणी व जनजागृती या विषयावर प्रा.डॉ.तक्षशिल सुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयाच्या टीम ने विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन केले व गावकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

.          ‘श्रम ही श्रीराम हमारा’, हे आनंदवनाचे ब्रीदवाक्य. रोज सकाळी होणाऱ्या श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमाचे महत्त्व रुजवले गेले.या सात दिवसात विद्यार्थ्यांनी पारोधी गावात रस्ता रुंदीकरण, गावातील साफसफाई, कच्चा रस्ता पक्का करणे, स्वच्छता अभियानातून प्लास्टिक गोळा करणे, पारोधी शाळेत होणाऱ्या बीट स्तरीय खेळांच्या स्पर्धेसाठी ग्राउंड तयार करणे अशी विविध कामे केली.

.      प्राचार्य डॉ.मृणाल काळे, उपप्राचार्य राधा सवाने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक प्रा.सुरेश राठोड व प्रा.मारुती मुंडे यांचे यशस्वी नियोजन,महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहाय्य,गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसाद यामुळे शिबिर यशस्वी रित्या संपन्न झाले.

error: Content is protected !!