नागभीड : ब्रह्मपुरी वन विभागातील नागभीड वनपरिक्षेत्रात दोन वाघांमध्ये झुंज झाली. या झुंजीत दोन्ही वाघ गंभीर जखमी झाले. त्यानंतर वन विभागाने दोन्ही वाघांवर पाळत ठेवली. यापैकी एक वाघ दूर निघून गेला, तर दुसरा वाघ झुंजीच्या ठिकाणाजवळच फिरत असल्याने वन विभाग त्याच्यावर लक्ष ठेवून होता. नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 110, कोसंबी (गवळी) बीट येथे रविवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन करून या जखमी वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले. सदर वाघ अंदाजे 10-11 वर्षे वयाचा नर वाघ आहे. त्याला पकडले गेले. जखमी वाघाला चंद्रपूर येथील टीटीसी येथे हलविण्यात आले आहे.


