Home चंद्रपुर जिल्हा विशेष अधिक ओलावा दाखवून कापसाचे भाव कवडीमोल

अधिक ओलावा दाखवून कापसाचे भाव कवडीमोल

1140

शेतकऱ्यांनी आवाज उचलला तर जिनिंग मालकाकडून मारहाण

कास्तकारांची आर्थिक लुट करणा-यांवर कार्यवाही करा

डॉ. आगलावे यांची मुख्यमंत्र्यांना तक्रार

चंद्रपूर : खाजगी जिनिंग धारक शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव देत नसल्याने शेतकरी भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सी.सी.आय मार्फत कापूस विक्री करीत आहे. वरोरा येथील स्वामी कॉटन कापूस खरेदी केंद्रात सीसीआय च्या माध्यमातून कापूस खरेदी सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कापसात ओलावा असल्याचे कारण पुढे करीत आहे. शेतकऱ्यांनी जाब विचारला तर शेतकऱ्यांसोबत अरेरावी करीत मारहाण केली जात असल्याचा प्रकार होत असल्याने संबंधित जिनिंग मालकावर कारवाई करा अशी मागणी ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाजपा चे डॉ. अंकुश आगलावे, यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे तक्रार केली आहे.

.     चंद्रपूर जिल्हयातील वरोरा शहरालगत वनोजा मार्डा रोडवर स्वामी कॉटन नावांने खरेदी केंद्र असून तेथे वरोरा तालुक्यातील शेतकरी आपला उत्पादीत केलेला कापूस विक्री करण्याकरीता आणतात. स्वामी कॉटन हे सी.सी.आय.मार्फत शेतक-यांचा कापून ग्रेडींग नुसार जागेवरच खरेदी करतात.

.     स्वामी कॉटन जीनिंग मध्ये जेव्हा शेतकरी कापूस विकायला आणतात तेव्हा जीनिंग व्यवस्थापन विक्रीस आणलेल्या कापूसाचा चुकीचा ग्रेडींग करून जास्त मोईच्यर असल्याचे भासवून शेतक-यांचा कापूस कमी भावात खरेदी करीत आहे. दिनांक 07 जानेवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास काही कास्तकार व प्रफुल पंढरी चवले यांनी कापूसाचे कमी ग्रेडिंग का करीत आहे असा सवाल विचारल्यास त्यांना जीनिंगचे मालक, कर्मचारी व ग्रेडर यांनी मारहाण केली. तसेच मारहाण प्रकरणाचे सत्य बाहेर येवू नये म्हणून जीनिंग परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे देखिल व्यवस्थापनाने बंद करून ठेवले.
स्वामी कॉटनचे कर्मचारी, व्यवस्थापक व मालक हे कापूसाचे ग्रेडेशन 8 असतांना देखिल ते ग्रेडेशन 11 दाखवून कापूसाला कमी भाव देत आहे. यामुळे शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच कापुस विकाल्याची पावती देखील देत नसल्याचे अनेक तक्रारी आहे. शेतकरी देशाचा पोशिंदा आहे. कबाड कष्टाने घाम गाळून उत्पादीत केलेला कापूसाला कमी भाव देवून कास्तकार बांधवाची आर्थिक लुट करीत आहे. कापूसाला योग्य ग्रेेडेशन देवून योग्य भाव मिळण्याची मागणी डॉ. अंकुश आगलावे, नरेंद्र जिवतोडे यांनी केली आहे.

error: Content is protected !!