Home चंद्रपुर जिल्हा विशेष नेरी- म्हसली रस्त्याची दुरावस्था

नेरी- म्हसली रस्त्याची दुरावस्था

1223

नव्याने मार्ग बनविण्याची ग्रामस्थांची मागणी

नेरी : नेरी- म्हसली मार्गाची दुरवस्था झाली असून या मार्गाने ये -जा करणे कठीण झाले असून जागोजागी खड्डे पडलेले आहे. रस्त्यावरील गिट्टी उखळून वाहेर आली आहे. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता शालेय विद्यार्थी त्रस्त झाले असून या मार्गाची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन तात्काळ नवीन मार्ग तयार करावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

.      मागील अनेक वर्षांपासून नेरी-म्हसली मार्गाचे बांधकाम झाले नाही. अनेकदा मागणी करूनही या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावरूनच कसे तरी शेतकरी, मजूर नागरिक, विद्यार्थी सर्व रहदारी करतात. मात्र रहदारी करताना वाहन चालवताना कसे चालवावे असा प्रश्न निर्माण होत आहे. या गंभीर बाबीची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

error: Content is protected !!