दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा
तुकडोजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नागरी
नेरी : चिमुर तालुक्यातील काजळसर येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक विविध कार्यक्रमांच्या रेलचेलीत मोट्या उत्साहाने पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येऊन राष्ट्रसंताना अभिवादन करण्यात आले.
. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोट्या उत्साहाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. होते दि 27 डिसें ला ग्रामस्वच्छता सामुदायिक प्रार्थना करून घटस्थापना हभप मगरे महाराज यांच्या हस्ते करून पुण्यतिथी ला सुरवात करण्यात आली. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात अनेक महिलांनी भाग घेतला यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात आली. लगेच हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन महिला सक्षमीकरण चा नारा देण्यात आला. रात्रौला ह.भ.प कविता गोपाल चांदेकर यांचे समाज प्रबोधन जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आला होता. तसेच अडेगाव काजळसर येथील भजन मंडळाचे जागृती भजनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक गावातील भजन मंडळांनी सहभाग घेतला होता.
. दि 28 डिसें ला सकाळी ग्रामसफाई सामुदायिक प्रार्थना करून वंदनीय महाराजांची पालखी मिरवणूक संपुर्ण गावातून वाजत गाजत काढन्यात आली होती. या मिरवणुकीत आदर्श विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक अनेक भजन मंडळे गुरुदेवभक्त गावकरी यांनी सहभाग घेतला होता. टाळ मृदंगाच्या निनादात व राष्ट्रसंताच्या जयघोषाने काजळसरनगरी दणाणून गेली. यानंतर गोपाळकाला व कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. कविता चांदेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दुपारी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, चंद्रपूर जिल्हा गुरुदेव सेवाधिकारी डॉ. शाम हटवादे तर अध्यक्ष म्हणून सरपंच आशिष ननावरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मच्छगंदा सामूसाकडे, नलिनी वाटगुरे, पुष्पा पुसतोडे, अर्चना गळमळे आदींसह अनेक गुरुदेव कार्यकर्ते पदाधिकारी मंचावर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
. मान्यवरांनी वंदनीय महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच ग्रामगितेचे विचार सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे सांगितले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सांगितले ४ वाजून ५८ मिनीटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लगेच महाप्रसाद वितरित करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासी काजळसर यांनी परिश्रम घेतले.


