भद्रावती : येथील कामतवार ट्रेडर्सचे संचालक तथा मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेचे सभासद गजानन कापुरदास कामतवार यांचे दि.२८ डिसेंबरला रात्री ८ वाजता चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचरादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते ४५ वर्षाचे होते.त्यांच्यावर दि.२९ डिसेंबरला स्थानिक मल्हारा स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पडला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.


