Home चंद्रपुर जिल्हा विशेष अखेर ! त्या प्रकरणाची पोलीस विभागाने घेतली दखल

अखेर ! त्या प्रकरणाची पोलीस विभागाने घेतली दखल

1215

ट्रॅक्टर वरून पडून मजुराचे मृत्यू प्रकरण

नेरी : चिमूर तालुक्यातील शिवणपायली येथील रेती घाटाचा लिलाव झाला नसतानाही अवैध रेती वाहतुकीमुळे ट्रॅक्टरखाली दबून लखन पोईनकर या तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शिवणपायली येथे १७ डिसेंबर रोजी घडली होती.

.     या प्रकरणाला सात आठ दिवस उलटणही नेरी चौकीचे पोलीस अधिकारी यांच्या कडून योग्य दिशेने तपास न होता दिरंगाई आणि तपासात संथगती होत असल्याने मृत्यूकाचे कुटुंबियांना व एकलव्य सेना संघटना यांनी संताप वक्त करून सदर प्रकारणावर आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेतल्याने व वृत्तपत्रातून बातम्या प्रसारित होताच पोलीस विभागाणे याची दखल घेत नेरी चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक यांच्या कडून सदर प्रकरणाचा तपास काढुन नव्यानेच चिमुर पोलीस स्टेशन मध्ये रुजू झालेले दबंग सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे यांच्या कडे तपास दिला आहे. त्यांनी तपासाची सूत्र हाती घेताच तपासाला सुरवात केली आहे. दिनांक २५ डिसेंबर ला प्रत्यक्ष शिवणपायली येथील घटनास्थळाची पाहणी करून मजुराचे बयान घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

.     मात्र सदर प्रकरनाचा योग्य दिशेने तपास केला जाणार का आणि सत्यता बाहेर येणार का या कडे शिवणपायली वासियांच्या नजरा लागल्या आहेत. प्रकरनाचा योग्य दिशेने तपास करून अठराविश्व दारिद्रात असलेल्या लखन पोईनकर च्या मृत्यू कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी जनतेतुन होत आहे.

वरिष्ठाच्या सुचने नुसार प्रकारणाची चौकशी करण्याचे कळविण्यात आल्याने मी प्रत्यक्षात घटना स्थळाला भेट दिली असून मजुराचे बयान घेण्यात आले आहे. ट्रॅक्टर मालक मात्र गावात नसल्याने चौकशी झाली नाहीं.योग्य चौकशी करण्यात येईल.                                                                                                                     मल्हारी ताळीकोटे,                                                         सहाय्यक पोलीस निरीक्षक, चिमुर

error: Content is protected !!