Home सामाजिक शिकारीच्या मागे असलेला बिबट विहिरीत पडला

शिकारीच्या मागे असलेला बिबट विहिरीत पडला

1220

बिबट्याला वाचविण्यात वनविभागाला यश

सिंदेवाहीतील देवाडा शेत शिवारातील घटना

सिंदेवाही : वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील नाचनभट्टी बीटातील देवाडा शेत शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास एका प्राण्याच्या मागे लागलेला बिबट विहिरीत पडला असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कडून मिळाली आहे.

.     ब्रम्हपुरी वनविभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत नवरगाव उपवन क्षेत्रातील नाचनभट्टी बीटा अंतर्गत मौजा देवाडा येथील विठोबा मारोती उईके यांचे गट क्रमांक १३४ मधील शेत शिवारात असलेल्या विहिरीमध्ये बिबट ( मादी) पहाटेच्या सुमारास पडली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. त्यामुळे वनविभागाने तात्काळ सिंदेवाही पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सागर महल्ले यांचे पुढाकारात टीम घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची गर्दी कमी केली.

.      विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सिंदेवाही अंतर्गत येत असलेली कर्मचारी चमू यांनी शर्थीचे प्रयत्न करून यशस्वीरित्या बाहेर काढले. व त्याला जेरबंद केले. सदर बिबट्याची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता ती वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ व सशक्त असून तिला निसर्गमुक्त करण्यात येईल. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

.     यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, क्षेत्र सहाय्यक एस.बी.उसेंडी, के डी.मसराम, वाय. एम.चौके, वनरक्षक एन. डी.शहारे, विकास येरमे, विनोद चिकराम, निखिल राठोड, संतोष पेंदाम, गोकुलदास राठोड, हेमराज सोरते, ऋषिकेश जावडे, विवेक फुलझेले, रवी मारभते, कमलाकर बोरकुंडवार इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!