Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेतात लावलेल्या सोलर कुंपणात अडकला बिबट

शेतात लावलेल्या सोलर कुंपणात अडकला बिबट

1223

कळमना शेत शिवारातील घटना

वन विभागाने केली बिबट ची सुटका

बल्लारपूर : शिकारीच्या शोधात असलेला बिबट शेतकऱ्यांच्या सोलर कुंपनात अडकल्याची घटना सोमवारी सकाळी कळमना शेत शिवारात उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने बिबट्याला बेशुद्ध करून बाहेर काढले.

.      बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्रात वाघ व बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून अनेकांना यांचे दर्शन होत असल्याने नागरिक दहशतीत आहे. जंगलाला लागून शेती असलेल्या शेतकऱ्यांनी कामे थांबवून ठेवली. अनेकांनी जंगलात जाणे बंद केले. त्यामुळे पिकांच्या बंदोबस्तासाठी अनेक शेतकऱ्यांनी सोलर कुंपन लावले. वन विभागाचे कर्मचारी कळमनामधील कक्ष क्रमांक ५७२ मध्ये पाहणी करीत असताना एक बिबट (नर) शेतीच्या लावलेल्या सोलर कुंपन तारात अडकून आढळून आला.

error: Content is protected !!