मृतक तरुणाच्या आई-वडीलाची पत्रकार परिषदेत मागणी
दिशाभूल करून मृत्यूचे कारण लपविले
पोलीस तपास शुन्य
नेरी : चिमूर तालुक्यात कोणत्याही प्रकारचे घाट लिलाव नसताना वाळूची तस्करी करण्याचा धंदा मागील अनेक वर्षापासून फोफावला आहे. याच अवैध रेती वाहतुकीमुळे ट्रॅक्टर खाली दबून तरुण हमालाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. 17 डिसेंबर शिवणपायली येथे घडली होती. मात्र अपघात एका ठिकाणी आणि दाखवीला दुसऱ्या ठिकाणी याप्रकारामुळे ट्रॅक्टर मालकाकडून दिशाभूल केल्या जात असल्याने त्या ट्रॅक्टरमालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मृतक मजुराच्या आई वडिलांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
. माझा मुलाचा मृत्यू नदी घाटावरच झाला होता त्याला त्याच ट्रॅक्टरवरची रेती खाली करून चिखली रोडवर अपघात झाल्याचे दर्शवून खोटी माहिती दिली गेली असल्याने माझ्या मुलाचा घातपातच करण्यात आला. मला कुठलेही कल्पना न देता बळजबरीने माझ्या मुलाला घरून नेऊन त्याला रेती तस्करी साठी नेण्यात आले होते. जेव्हा अपघात झाला त्यावेळेस मला कुठलीही माहिती दिली नाही पहाटे 6 वाजता त्यांनी रुग्णालयातून फोन करून सदर माहिती दिली. मात्र घटना गावाजवळ असूनही का लपविली गेली हे मात्र गुलदस्त्यात आहे, त्यामुळे यात घातपात सुद्धा झाले असेलच यात काही शंका नाही. तेव्हा ट्रॅक्टर मालक व सर्व हमालावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृत्यू तरुणांच्या आई वडिलांना चिखली येथे घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केला आहे.
. सात दिवस उलटणही साधी चौकशी न झाल्याने पोलीस विभाग सुद्धा जाणीवपूर्वक पूरावे नष्ट करण्यासाठी गुन्हेगाराला मोकळीक देत आहेत असाही आरोप पत्रकार परिषद मध्ये करण्यात आला आहे. ट्रॅक्टर मालकवर गुन्हा नोंद करून मृत्यूकास २५ लक्ष रु देण्यात यावे. अन्यथा सर्व समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी सुद्धा करण्यात आली. या पत्रकार परिषदेला, वडील अंबादास दुधीराम पोईनकर, भाऊ देवानंद पोईनकर, आई माया अंबादास पोईनकर, एकलव्य सेना चे संस्थापक अध्यक्ष विदर्भ प्रांत प्रकाश नान्हे, हेमंत रामदास पोईनकर, उद्धव सीताराम पोईनकर, गोविंदा मेश्राम हरणी, कृष्णा बहादूरे आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
बाल कामगारा कडून करीत होते रेती तस्करी रात्रौला गावातीलच बालकामगार मुलाना पैशाचे अमिष दाखवून रात्रौला अव्यध रेती तस्करी साठी ट्रॅक्टर मालकाने रेती भरण्यासाठी मजुरीला लावून बाल कामगार कायद्याला तिलांजली देत कायदा मोडून गुन्ह्यास पात्र ट्रॅक्टर मालकाला अभय दिल्या जात आहे.
ट्रॅक्टर चा इन्शुरन्स नाही अपघात ग्रस्त ट्रॅक्टर चा इन्शुरन्स संपला असताना तो उतरविला नसून बेकायदेशीर ट्रॅक्टर ची रहदारी सुरू ठेवून परवाना विभागाची दिशाभूल केली. तरी मात्र सदर ट्रॅक्टर मालकावर पोलीसांनी व आरटीओ नी गुन्हा दाखल केला नाही. जड वाहन चालकाला परवाना नसताना सर्रास पणे ट्रॅक्टर चालविल्या जात होते. एवढे मोठे अवैध काम असूनही पोलीस विभाग आणि महसूल विभाग अनभिज्ञ कसे असा प्रश्न निर्माण होत आहे


