राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव
सिंदेवाही : श्री गुरुदेव सेवा मंडळ टेकरी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा २४ ते २५ डिसेंबर ला दोन दिवसीय वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्याने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज रात्री ७ वाजता सप्तखंजेरी वादक, राष्ट्रीय कीर्तनकार इंजि. भाऊसाहेब थुटे यांच्या कीर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत असून त्यांचा विदर्भात जरी संचार असला, तरी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी अध्यात्मिक, सामाजिक, व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करून विश्वबंधुत्वतेचा संदेश दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्याअनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केल्या जाते. सिंदेवाही पासून ३ किलोमिटर अंतरावरील टेकरी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला असून २४ डिसेंबर रोजी घटस्थापना करून रात्री प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच २५ डिसेंबर ला सकाळी ८ वा.रामधूनच्या विषयावर तसेच दुपारी ३ वा. युवा राष्ट्रीय प्रबोधनकार राजदादा घुमणार यांच्या वक्तृत्वाची तोफ गरजणार आहे.
. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून गोपाल काल्याच्या वेळी ह. भ. प. अनिल महाराज खामणकर यांचे कीर्तन होणार आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष केशव मंडलवार आणि सचिव वासुदेव गायकवाड यांनी केले आहे.


