भुजबळांच्या आदेशाविरूध्द सरपंच व गावकऱ्यांचे आमरण उपोषण
स्वस्त धान्य दुकानात अफरातफर प्रकरण
आदर्श ग्रामपंचायत सागरा येथील प्रकार
चंद्रपुर : जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सागरा येथील स्वस्त धान्य धारकाकडून शिधापत्रिका धारकाकडून जास्तीचे पैसे घेणे, पावती न देणे, अन्य धान्य वितरित करण्यात दिरंगाई करणे सह इतर स्वरूपाचे दोष आढळून येत असल्याने सागरा गावकर्यांनी तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांचे कडे तक्रार दाखल केली. याची दखल घेत चौकशी अंती दोषी आढळल्याने रास्त भाव दुकानास संलग्न करण्यात आले होते. मात्र माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अर्ज अशतः मंजुर करून उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर व जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी पारीत केलेला आदेश रद्द करून प्राधिकारपत्र धारक यांचे स्वस्त धान्य दुकान पुर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांना दिले. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या आदेशा विरूध्द आदर्श ग्राम पंचायत सागरा, येथील आदर्श सरपंच शंकर न. रासेकर व गावक-यांनी 16 डिसेंबर पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.
. प्राप्त माहिती नुसार सागरा येथील सरपंच व गावकऱ्यांनी दिनांक 10/04/2023 रोजी सागरा येथील रास्तभाव दुकानदार प्राधिकारपत्र धारक मोतीराम सिताराम मारेकर यांची तक्रार केली होती सदर तक्रारीची दखल घेवुन तहसिलदार भद्रावती व निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक यांनी चौकशी केली असता प्राधिकारपत्र धारक दोषी आढळले त्यामुळे दिनांक 19/04/2023 ला सागरा येथील रास्त भाव दुकानदार मोतीराम सि. मारेकर यांचे कडील रास्तभाव दुकान वाघेडा येथील रास्त भाव दुकानास संलग्न करण्यात आले होते. त्यानुसार तपासणी वेळी शिल्लक असलेले अन्न धान्य जप्त करून सुपुर्त नामावर आनंदराव दातारकर प्राधिकारपत्र धारक यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे सागरा येथील प्राधिकारपत्र धारक मोतीराम सि. मारेकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांच्या कडील अपील केली असता सुनावणी मध्ये दोषी आढळल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिनांक 16/05/2023 रोजीच्या आदेशान्वये मोतीराम सि. मारेकर यांचे कडील प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द केले होते. तसेच स्वस्त धान्य दुकानदार मोतीराम सि. मारेकर यांचे कडुन रू. 1 लाख 45 हजार 194 रुपये वसुल करावे असा आदेश काढला होता.
. जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिनांक 16/05/2023 रोजी केलेल्या आदेशा विरूध्द मोतीराम मारेकर यांनी पुर्ननिरीक्षण अर्ज उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर यांचे कडे दाखल केला. सदर प्रकरणाची वारंवार सुनावणी घेतल्यानंतर उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर यांनी दिनांक 21/08/2023 रोजी आदेश पारीत करून अर्जदार मोतीराम सि. मारेकर यांनी दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज नामंजूर केलेला होता व जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांचा दिनांक 16/05/2023 रोजीचा आदेश कायम ठवेलेला होता.
. परंतु प्राधिकारपत्र धारक मोतीराम सि. मारेकर यांनी उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर व जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी केलेल्या आदेशाविरूध्द माजी मंत्री छगन भुजबळ मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांचे कडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला त्यानुसार दिनांक 12/02/2024 रोजी सुनावणी घेण्यात आली, झालेल्या सुनावणी अन्वये मंत्री छगन भुजबळ यांनी मोतीराम सि. मारेकर यांचा अर्ज अशतः मंजुर करून उपायुक्त (पुरवठा) नागपुर विभाग, नागपुर व जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी पारीत केलेला आदेश रद्द करून प्राधिकारपत्र धारक मोतीराम सि. मारेकर यांचे स्वस्त धान्य दुकान पुर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपुर यांनी दिले.
. गैरव्यवहार करून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला आदेश अत्यंत अन्याय कारक असुन शासकीय अधिकाऱ्यांनी कलेल्या कार्यवाही विरूध्द तसेच सागरा गावकऱ्यांच्या विरूध्द आहे त्यामुळे आदर्श ग्राम पंचायत सागरा येथील सरपंच शंकर न. रासेकर व गावकरी दिनांक 16 डिसेंबर ला दुपारी 4 वाजता पासुन आमरण उपोषणाला बसलेले आहेत. जोपर्यंत सदर आदेश रद्द होणार नाही व स्वस्त धान्य दुकानदार मोतिराम सि. मारेकर यांचे प्राधिकारपत्र कायमस्वरूपी रद्द होणार नाही तो पंर्यत आमरण उपोषण चालु राहील अशी भुमिका सरपंचासहीत गावकऱ्यांनी घेतलेली आहे.


