Home सामाजिक भद्रावतीतील रोटरी उत्सव मेल्याला स्थगिती

भद्रावतीतील रोटरी उत्सव मेल्याला स्थगिती

1263

नवी तारीख लवकरच होणार जाहीर

पत्रकार परिषदेत माहिती

भद्रावती : रोटरी क्लब तर्फे शहरातील तालुका क्रीडा संकुलनात रोटरी उत्सव मेळ्याचे आयोजन दिनांक 20 ते 25 डिसेंबर या कालावधीत करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सदर उत्सव मेला काही कालावधी करीता स्थगित करण्यात आला असून या उत्सव मेल्याची नवी तारीख लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती रोटरी क्लब, भद्रावती तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार पत्रपरिषदेतून देण्यात आली आहे.

.       सदर मेल्यासाठी नृत्य स्पर्धा तथा इतर स्पर्धेसाठी जे ऑडिशन घेण्यात आले होते हे पुढेही कायम राहणार असल्याची माहितीही पत्रकार परिषदेतून देण्यात आली. सदर दिवाळी उत्सव मेल्याचे आयोजन रोटरी क्लब तर्फे दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत करण्यात येत असते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकितील आचारसंहितेमुळे यावर्षीचा हा मेला २० ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. मात्र तांत्रिक कारणामुळे तो तात्पुर्ता स्थगीत करण्यात आला आहे.

सदर पत्रकार परिषदेला रोटरी चे अध्यक्ष किशोर खंडाळकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनील पोटदुखे, सुधीर पारधी, प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!