वंचित बहुजन आघाडी ची मागणी
भद्रावती : परभणी येथे झालेली संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना, पोलिसांचे बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन, आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठाडीतील खून ह्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी, तालुका व शहर कार्यकारणीने केली आहे.
. परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. एका आरोपीला लोकांनी पकडला परंतु दुसरा आरोपी अजूनही फरार आहे. ह्या घटनेनंतर शहरात प्रतिक्रिया उमटल्यात. आणी नंतर पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन केले. भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा न्यायालयीन कोठडीतील खून हे संपूर्ण प्रकरण नियोजनबद्ध कट रचून केल्याचा आरोप करण्यात आला.
. सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी, शाहिद सोमनाथ सूर्यवंशी ह्यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये नुकसान भरपाई व त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, जखमींना 25 लाखाची नुकसान भरपाई, सदर प्रकरणातील आरोपीला मनोरुग्ण म्हणणाऱ्या डॉक्टरांची चौकशी, व पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरील मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी ने दिला. तहसीलदार ह्यांना निवेदन देतांना पक्षाचे तालुकाध्यक्ष विशाल कांबळे, महिला तालुकाध्यक्षा संध्या पेटकर, महिला शहराध्यक्ष राखी रामटेके, कविता गौरकार, सुनिल खोब्रागडे, नगरसेवक, सिमा ढेंगळे नगरसेवीका, लता टिपले, वैशाली चिमुरकर, देवेंद्र वानखेडे, गमतीदास रायपुरे, सतीश मस्के,अजय पाटील, अरुण कवाडे, प्रवर्ता भोवते, चंद्रकला गेडाम, पोर्णीमा पाटील, उषा मेश्राम, रमेश गेडाम, विजय पाटील, भिमराव भोवते, ललीता ताडे, हरीहर थूलकर, आशा गायकवाड, विमल रामटेके, निलीमा सोनारकर, राहुल गैरकार, पंचफुला नगराळे मोठ्या संख्येने ईतर कार्यकर्ते उपस्थित होते,