Home चंद्रपुर जिल्हा विशेष चिमूर अत्याचार प्रकरणातील त्या नराधमांना न्यायालयीन कोठडी

चिमूर अत्याचार प्रकरणातील त्या नराधमांना न्यायालयीन कोठडी

950

नेरी : खाऊचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना बुधवारी (दि.१६) वरोरा येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपी नसिर वजीर शेख (४८), रसिद रूस्तम शेख (५८) या दोघांची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.

.      चिमुर शहरातील १० वर्षीय व १३ वर्षीय दोन मैत्रिणींवर खाऊचे आमिष दाखवून त्याच वार्डातील आरोपी नसिर वजीर शेख (वय ४८) रसिद रूस्तम शेख (वय ५८) यांनी वारंवार अत्याचार केला. सोमवारी अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर पिडीतेच्या आईने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे चिमूर शहरात संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाई मागणी केली. रात्री तीन वाजेपर्यंत संतप्त जमावाने चिमूर पोलिस ठाण्याला चार तास घेराव घातला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

.     मंगळवारी (दि.१५) त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्याने (बुधवारी) पुन्हा दोन्ही आरोपींना वरोरा येथील सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. सत्र न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली असून दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

error: Content is protected !!