भद्रावती : श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती भद्रावती चे वतीने दि. २७ एप्रिल ते ६ मे २०२५ पर्यंत गणपती मंदिर, सुर्यमुखी हनुमान मंदिर परिसर, भक्त निवास गवराळा येथे श्रीगुरूदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
. या सुसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रामुख्याने बौध्दीक, व्यायाम, संगीत या विषयाअंतर्गत मल्लखांब, टाळ व पदन्यास, लाठी-काठी, कुस्ती, दांडपट्टा, कराटे, गायन, वादन, वकृत्व कला, श्रीमद्भगवदगीता, ग्रामगीता, थोर-मोठ्यांचे चरित्र, वक्तशीरपणा, संगीताचे प्राथमिक ज्ञान इत्यादी सद्गुण संवर्धनाचे विषय शिकवल्या जाणार आहे. तसेच ग्रामजयंतीचे औचित्य साधुन दिनांक ६ मे रोज मंगळवारला संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणाऱ्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी शिबीरादरम्यान विद्यार्थ्यांना शिकविलेल्या विविध विषयांचे प्रात्यक्षिके व सन्मान सोहळा विद्यार्थी सादर करणार असुन होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाकरिता नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे वतीने करण्यात आले आहे.
. शिबिर प्रवेश नोंदणी दिनांक २६ एप्रिल २०२५ रोज शनिवारला सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंतच होईल. वय १० ते १४ वर्षे वयोगटा मधील विद्यार्थ्यांना शिबिरामध्ये प्रवेश असुन, अपेक्षित प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येईल असे आवाहन श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर समिती, भद्रावतीचे वतीने करण्यात आले आहे.


