बल्लारपूर : तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायत आहे.आज बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली.यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ४, सर्वसाधारण वर्गासाठी ८ ,तर नामाप्रसाठी केवळ २ ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे आरक्षण देण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यात १७ ग्रामपंचायत मध्ये ओबीसी ( नामाप्र ) लोकसंख्या लक्षणीय असताना केवळ २ ग्रामपंचायत मध्ये ओबीसी ला सरपंच पद देण्यात आल्यामुळे सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेवर नागरिकांकडून पश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सरपंच पद नामाप्रसाठी राखीव बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायत साठी सरपंच पदाचे आरक्षण आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर येथील सरपंच पद नामाप्र सर्वसाधारण असे जाहीर करण्यात आले.विशेष म्हणजे याच वर्गातील महिलासाठी बामणी ( दुधोली ) येथील सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.ही आरक्षण सोडत आज बुधवार ला प्रभारी तहसिलदार महेंद्र फुलझेले यांच्या अध्यक्षतेखाली बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. बल्लारपूर तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी इटोली, अनुसूचित जाती महिलासाठी गिलबीली व दहेली येथील सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मानोरा व लावारी,तर अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आमडी व हडस्ती येथील सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.सर्वसाधारण म्हणून नांदगाव ( पोडे ),किन्ही, कोठारी व पळसगाव ,तर सर्वसाधारण महिलासाठी कोर्टीमक्ता, कळमना,काटवली ( बामणी ) व कवडजई येथील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी बल्लारपूरचे प्रभारी तहसिलदार महेंद्र फुलझेले, नायब तहसिलदार सतीश साळवे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्याची उपस्थिती होती.


