Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा शहरात शेतकर्‍यांचे भीक मांगो आंदोलन

वरोरा शहरात शेतकर्‍यांचे भीक मांगो आंदोलन

1293

भिकेची रक्कम कृषी अधिकार्‍यामार्फत राज्य सरकारला भेट

4 हजार रुपयाची मिळाली भीक

आ. संजय देरकर यांच्या हस्ते भीक मांगो आंदोलनाची सुरवात

वरोरा : शेतकर्‍यांच्या विविध मागण्या घेऊन शेतकरी नेते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाची सुरवात वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी सुद्धा उपस्थित होत्या. भीक मांगो आंदोलनाची जमा झालेली रक्कम तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आली.

.     वरोरा शहरातील रत्नमाला चौक येथून भीक मांगो आंदोलनाची सुरुवात  करण्यात आली. दरम्यान त्याच वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे उबाठा गटाचे नवनियुक्त आमदार संजय देरकर अचानक पणे हजर राहून आंदोलन स्थळी उपस्थित झाले. त्यांच्या हस्ते डॉ. ऐ पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भीक मांगो आंदोलनास सुरुवात करण्यात आली. आमदार देरकर यांनी स्व:ता 1 हजार रुपयाची भीक देऊन शेतकरी आंदोलनास सहकार्य केले तसेच त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी यांनी नारे बाजी करत आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सदर भीक मांगो आंदोलनाची सुरवात  रत्नमाला चौक पासून करण्यात आली. व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भीक मांगो आंदोलनातून जमा झालेली 4 हजार रुपयाची रक्कम तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे सोपवून त्यांच्या मार्फत  राज्य शासनाला पाठविण्यात आली. तसेच सदर मागण्या पुढील एक महिन्यात मान्य कराव्या अन्यथा शेतकरी आत्मदहन करणार असा इशारा ही यावेळी दिला. तर संबंधित विषय नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात गाजविणार असल्याचे आमदार संजय देरकर यांनी यावेळी सांगितले.

.     या आंदोलनास शेतकरी नेते किशोर डुकरे, छोटू शेख, दत्ता बोरेकर, श्याम लेडे, वसंत विधाते, पुष्पाकर खेवले, तुकाराम निब्रड, संदीप वासेकर, मनोहर आस्वले, केशव ताजने, मंगेश एकरे, वृषभ आस्वले, प्रसाद मिलमीले, मनोज तेलंग सह तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

भिकेतून जमा झालेली रक्कम राज्य शासनाला पाठविली                                                                                                                   शेतकर्‍यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकार कडून एक रुपयात पीक विमा काढल्या जात आहे. मात्र पीक विमा कंपनीकडून दखल घेतल्या जात नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊनही नुकसान भरपाई दिल्या जात नाही. मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पीक विमा कंपनीने फक्त सोयाबीन पिकाचा विम्याचे पैसे शेतकर्‍यांना दिले. मात्र कापूस पिकाचा पीक विमा दिला नाही. तर मागील वर्षी रब्बी हंगाम चणा, गहू या पिकावर गारपीट झाली. त्यांचे महसूल विभाग कडून पंचेनामे करुन हेक्टरी 13 हजार 500 रुपये या प्रमाणे शेतकरी यांना रक्कम दिली. मात्र शेतकरी पीकाचा पीक वीमा काढला मात्र या पीकाचे पंचनामे करून तुटपुंजी रक्कम पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिली. मागील वर्षाचा कपाशी वरील पीक विमा देण्यासाठी सरकार जवळ पैसे नसल्याने आम्ही शेतकरी भीक मागून गोळा झालेले चार हजार रुपये पैसे राज्य सरकारला परत पाठविले.                                                                                                                 किशोर डुकरे,                                                                      शेतकरी नेते, वरोरा

error: Content is protected !!