Home सामाजिक परसोडा येथिल सुभाषच्या पत्नीला मिळाला विम्याचा लाभ

परसोडा येथिल सुभाषच्या पत्नीला मिळाला विम्याचा लाभ

1272

विमा काढताच एका महिन्यात झाला मृत्यू

वरोरा : कुटुंबाच्या व आपल्या सुरक्षेतेसाठी परसोडा येथील एका व्यक्तीने भारतीय जिवन बिमा निगमचा विमा काढला. आणि विमा काढल्यानंतर एक महिन्यातच त्याचे आजाराने निधन झाले. त्याच्या पत्नीने विमा कंपनीकडे दावा करताच 1 लाख रुपयाचा लाभ त्याच्या पत्नीला मिळाला.

.       परसोडा येथिल सुभाष बोधाने यांनी शारदा प्रमोद नागापुरे झेड एम क्लब मेंबर यांच्या वतीने भारतीय जिवन बिमा निगम शाखा वरोरा कडुन एक लाख रूपयाची पॉलिशी काढण्यात आली होती व याचे वार्षिक प्रिमीयम 6436 रूपये भरणा केली होती परंतू सुभाष बोधाने यांची पॉलिशी काढल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पत्नीने विमा कंपनीकडे मृत्यु दावा केला त्यानंतर विमा कंपनीच्या वतीने नुकताच विमाच्या लाभ मिळाला असल्याचे सांगितले सुभाष बोधाने यांनी आयुविमा महामंडळाकडुन दि. 26.03.2024 ला एक लाख रूपयाची पॉलिशी काढली होती त्यांच्या पत्नीला मृत्यु दाव्याचा क्लेम 103800 रूपये वरिष्ठ शाखा प्रबंधक मोहन गोगुलवार, सुनिल बिजवे उपशाखा प्रबंधक सेल्स सचिन उघडे विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दावाच्या क्लेम संबधित विमा प्रतिनिधी शारदा प्रमोद नागापुरे यांनी अथक परिश्रम घेऊन मृत्यु दावा मिळवून दिला त्यांची सेवा हि ग्राहकासाठी तत्पर आहे. असे मृतकाची पत्नी अश्विनी बोधाने यांनी आपले मत व्यक्त केले मृत्यु दावा क्लेम देतांना रमेश पावडे उपसंरपंच ग्राम पंचायत परसोडा हे उपस्थित होते.

error: Content is protected !!