तेलंगणा राज्यातील मुलुगु भूकंपाचा केंद्रबिंदू
रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद
नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी. यांनी केले आहे.


