वरोरा : तालुक्यातील चरुरखटी येथे दिवंगत भगवान लक्ष्मण तेलंग यांचे स्मृती प्रित्यर्थ संबोधी बुद्ध विहार, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दि. ०१ डिसेंबर रोजी भदंत धम्मघोष मेत्ता महाथेरो व संघ यांच्या हस्ते परित्रान पाठ घेऊन करण्यात आले.
. यावेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वरोरा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष विलास टिपले, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती विशाल बदखल, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, शिवसेना नेते बंडू डाखरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अविनाश ढेंगळे, माजी उपसभापती देवानंद मोरे, प्रमोद मगरे, माजी नगरसेवक प्रमोद काळे, संजय घागी सह अनेक मान्यवारांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.


