Home चंद्रपुर जिल्हा विशेष पक्षाच्या शिकार प्रकरणी एकाला अटक

पक्षाच्या शिकार प्रकरणी एकाला अटक

1306

बल्लारपूर वन विभागाची कारवाई

वर्धा नदी पात्रातून पकडले पक्षी

बल्लारपूर : निसर्ग चक्रात पक्षी महत्वाचा घटक आहे. हिवाळ्याच्या दिवसात पक्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करतात. असेच पक्षी बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाजवळील वर्धा नदी पात्रात आहे. या पक्षांची अवैधरित्या शिकार केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली. ही कारवाई बल्लारपूर वन विभागाने सोमवार (२५) नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता विसापूर फाटा मुख्य मार्गावर केल्याची घटना घडली.

.      बल्लारपूर वन विभागाने या प्रकरणी आरोपी संजय दादाजी नान्हे (33) रा. विसापूर, ता. बल्लारपूर याला अटक केली आहे. त्याचेवर वन विभागाने वन्य प्राणी (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम २,९,3९,४४,४९ (बी), ५0,५१ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.      वाराबुकी हे पक्षी निसर्गातील महत्वाचा घटक आहे. हे पक्षी ४0 मैल प्रती तास वेगाने उडतात. या पक्षांची शिकार करून आरोपी ग्राहकांना विक्री करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. पक्ष्यांची अवैधरित्या शिकार करून ग्राहकांना विकण्याच्या तयारीत असताना संजय नान्हे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता मृत पक्षी आढळून आले. आरोपीच्या घरी देखील जिवंत पक्षी असल्याचे दिसून आले. त्याचेकडून मृत व जिवंत पक्षी, पक्षी पकडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

.      ही कारवाई सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, पक्षी मित्र मुकेश भांदककर, यांच्या उपस्थितीत क्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत, वनरक्षक वर्षा पिपरे, सूधीर बोकडे, अनिल चौधरी, नितेश बावणे यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!