चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखेची कारवाई
चंद्रपूर : येथील नरेंद्र नगर मध्ये राहणार्या एका ईसमाकडे कृत्रिम देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखा रामनगरच्या पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्याचे घरी कृत्रिम देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. देशी कट्टा बाळगणारा आरोपी नरेश भिक्षापती तुर्पटी, रा. नरेंद्र नगर, जैन लेआउट, बायपास रोड, चंद्रपूर याला देशी कट्ट्यासह पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.
. पोलिस सूत्रांनुसार चंद्रपूर जिल्हा गुन्हे शाखेला रामनगर परिसरात गस्त घालताना नरेंद्र नगर, जैन लेआउट, बायपास रोड, चंद्रपूर येथील एका ईसमाकडे कृत्रिम देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान आरोपीच्या घरातून एक कृत्रिम देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. यानंतर आरोपीविरुद्ध भादंवि कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी त्याला रामनगर पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.
. हि कारवाई चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेच्या दिशेने आणि गुन्हेगारांवर कडक कारवाईच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, यावरून पोलिस कोणताही गुन्हा खपवून घेणार नाही आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सिद्ध होते.
. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस हवालदार दीपक डोंगरे, ना.पो. संतोष येलपुलवार, पोका. गोपाल आटकुलवार, गोपीनाथ नरोटे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


