Home सामाजिक विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

विवेकानंद महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

1315

भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आज सविधान दिन साजरा करण्यात आला.

.       यावेळी अध्यक्षस्थानी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. व्ही.व्ही. टोंगे, प्रमुख मार्गदर्शक प्रा. नरेंद्र लांबट, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. जयवंत काकडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लांबट यांनी संविधानाची निर्मिती, संविधानाचे उद्देश, संविधानातील नागरिकांची कर्तव्ये, संविधानातील विविध कलमे, महिलांच्या संरक्षणासंबंधात असलेली कलमं या सर्वांचा आढावा घेत, आज विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून सविधान अंगीकृत करणे आवश्यक आहे. असे केले तरच आपली शासन व्यवस्था व्यवस्थित कार्यरत राहून आपली लोकशाही सुदृढ राहील, दीर्घजिवी राहील असे प्रतिपादन लांबट यांनी केले.

.      कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. टोंगे यांनी संविधान सभा, संविधान सभेची निवड, संविधान निर्मितीची प्रक्रिया, यांचा लेखाजोखा मांडत संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. तर मागाहून विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. जयवंत काकडे, संचालन डाॅ. रमेश पारेलवार आभार डॉ. गजानन खामनकर यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!