भद्रावती : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांनी लोकमान्य विद्यालय चे प्रांगणात संपन्न होणार आहे.
. दिनांक २९ नोव्हेंबर रोज शुक्रवारला सकाळी ५.३० वाजता शेषानंद पांडे महाराज यांचे हस्ते श्री गुरुदेव अधिष्ठानाचे पूजन व सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता सामुदायिक प्रार्थना होईल याप्रसंगी प्रा. रूपलाल कावळे वरोरा यांचे मार्गदर्शन होणार असून रात्रौ ठीक ८ वाजता सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य रामपाल महाराज यांचा राष्ट्रीय किर्तनाचा कार्यक्रम होईल. दिनांक ३० नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी ९ वाजता गोपालजी कडू गुरुकुंज आश्रम यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा परिसंवाद स्पर्धा संपन्न होईल. या स्पर्धेकरिता प्रमुख अतिथी म्हणून मनोज महाराज चौबे, राज घुमनर उपस्थित राहतील. दुपारी ठीक १ वाजता महिला सम्मेलन बेबीताई काकडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून याप्रसंगी निर्मला खडतकर, कविता येनुरकर, निता कोतमवार, साक्षी पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
. यानंतर सामुदायिक प्रार्थना प्रसंगी अरविंदजी राठोड चिंतन प्रगट करतील. यानंतर सायंकाळी ७ वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमाला त्यानंतर कर्करोग प्रतिबंध लक्षणे व उपचार यावर डॉ. प्रफुल खुजे यांचे मार्गदर्शन होईल व रात्रौ ८ वाजता “स्वर गुरुकुंजाचे” हा राष्ट्रसंतांच्या भजनावर आधारित कार्यक्रम संयोजक अमोल बांबल व मानव सेवा छात्रालय गुरुकुंज आश्रम मोझरी येथील विद्यार्थी सादर करतील. दिनांक १ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ७ वाजता रामधून निघेल याप्रसंगी रवींद्रजी ढवळे यांचे मार्गदर्शन होईल, दुपारी १२ वाजता शिवचरित्रकार व प्रबोधनकार ह.भ.प.किशोर महाराज ठाकरे आळंदीकर यांचा कीर्तन व गोपालकाला कार्यक्रम संपन्न होणार असून गोपालकाला प्रसंगी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, सर्वाधिकार लक्ष्मणरावजी गमे, खासदार प्रतिभा धानोरकर,माजी केंद्रिय राज्यमंत्री हंसराज अहिर तसेच सेवकरामजी मिलमिले यांचे मार्गदर्शन होईल.
. याप्रसंगी मंडळाची दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली तसेच सेवा गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता राष्ट्रसंत व्याख्यानमाला व त्यानंतर राष्ट्रसंत विचार चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल, रात्रौ ८ वाजता संमोहन कार्यक्रम नवनाथ गायकवाड पुणे यांचा मनोविज्ञानावर आधारित मनोरंजनातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. संपूर्ण कार्यक्रम प्रसंगी श्री गुरुदेव जिजाऊ महिला भजन मंडळ चंद्रपूर, साईनाथ भजन मंडळ भद्रावती व संत कृपा भजन मंडळ भद्रावती यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. या सर्व कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीचे वतीने करण्यात आलेले आहे.


