Home चंद्रपुर जिल्हा विशेष बेरोजगारीने त्रस्त तरूणाने घेतला गळफास

बेरोजगारीने त्रस्त तरूणाने घेतला गळफास

1294

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील घटना

आईने एकुलत्या मुलाच्या आत्महत्येने फोडला हंबरडा

विसापूर : आई शेतीच्या कामासाठी शेतशिवारात गेली.पत्नी मुलीला अंगणवाडी मध्ये नेऊन देण्यासाठी गेली. घरी तो जेवण करत होता. मात्र, त्याच्या मनात वेगळाच विचार घोळत होता. याच विचारचक्रात त्याने लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला. ही घटना आज शुक्रवारी दुपारी १२.२0 वाजता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे घडली.पवन दिवाकर थेरे (२८) रा. वार्ड क्रमांक १ विसापूर असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. त्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते.

.     विसापूर येथील दिवाकर थेरे हा ग्रामपंचायत मध्ये रोजंदारी मजूर म्हणून कामाला आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचेकडे वडिलोपार्जित चार एकर शेतजमीन आहे. मात्र शेतातील उत्पन्न जेमतेम आहे. अशातच पवन ला कोठेही रोजगार नव्हता. यामुळे पत्नी कालेश्वरी व दोन लहान मुलींचे संगोपन करण्यात अडचण येत होती. याचा पवनला मानसिक त्रास सहन करावा लागत होता.

.       शुक्रवारी त्याची आई छाया ही नेहमी प्रमाणे शेतशिवारात शेतीच्या कामासाठी बाहेर गेली होती. वडील दिवाकर घराच्या मागच्या बाजूला कोणतेतरी कामात व्यस्त होते. पत्नी छाया ही तीन वर्षाच्या मनस्वी ला अंगणवाडी शाळेत सोडायला गेली होती. पवन हा त्यावेळी घरी जेवण करत होता. मात्र,त्याच्या मनात वेगळाच विचार आला. त्याने लहान मुलींच्या पाळण्याच्या दोरीने घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आईवडीलाचा तो एकुलता मुलगा आहे. यामुळे एकुलत्या मुलाच्या आत्महत्येने आईने घरी येताच हंबरडा फोडला. त्याच्या पश्चाताप आईवडील, पत्नी ,दोन चिमुकल्या मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास विसापूर पोलीस चौकीचे जमादार जीवन पाल करत आहे.

error: Content is protected !!