Home जाहिरात वरोऱ्यातील एसए योगा इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा शालेय राज्यस्तरीय योग स्पर्धेत सुवर्ण पदक

वरोऱ्यातील एसए योगा इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा शालेय राज्यस्तरीय योग स्पर्धेत सुवर्ण पदक

1296

वरोरा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, (म.रा.) पुणे या अंतर्गत लातूर येथे आयोजित महत्वाच्या अश्या राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मुलींमध्ये सई नेवास्कर हिने १७ वर्ष वयोगट नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले व या संघाने टीम इव्हेंट मध्ये तृतीय क्रमांक मिळवत रौप्य पदक प्राप्त केले तसेच मुलांमध्ये १७ वर्ष वयोगटात साहिल खापणे याने नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करत या संघाने टीम इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक प्राप्त केले.

.      या स्पर्धेत मुलांमध्ये १४ वर्ष वयोगटात राम झाडे व रूद्राक्ष डांगरे याने नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करत या संघाने टीम इव्हेंट मध्ये द्वितीय क्रमांक घेत रजत पदक प्राप्त केले. या सर्वांनी आपला मोलाचा वाटा देत नागपूर विभागासाठी चमकदार कामगिरी केली व आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा मान वाढविला.

.      सर्व खेळाडू एस. ए. योगा इन्स्टिट्यूट मध्ये मागील बऱ्याच वर्षापासून कठीण परिश्रम घेत आहेत या मेहनतीच्या बळावर आज त्यांनी हि चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे एस. ए. योगा इन्स्टिट्यूट, वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव असे योगा इन्स्टिट्यूट आहे जे अनेक वर्षापासून मुलांना योगासन साठी प्रशिक्षित केले जात आहे. सर्व विजेते सई नेवास्कर, राम झाडे, रूद्राक्ष डांगरे व साहिल खापने यांचे एस. ए. योगा इन्स्टिट्यूट चे संस्थापक स्वप्नील पोहनकरव अनिकेत ठक यांच्याकडे नियमित सराव करत आहे. विजेत्या सर्व योगपट्टूचा सर्व पालक तथा मार्गदर्शकांकडून अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!