Home राजकीय एकच चर्चा : “कोण येईन गा भाऊ”

एकच चर्चा : “कोण येईन गा भाऊ”

1300

उत्सुकता शिगेला, निकालाकडे लक्ष

गावकट्ट्यावर आकडेमोड ; उमेदवारांची झोपमोड

वरोरा : मतदारांनी दिलेला कौल नेमका कुणाच्या बाजूला? याची आता गावकट्ट्या सह पानटपरीवर जोरदार चर्चा रंगत आहे. नागरिक आकडेमोड करीत ‘हाच’ उमेदवार निवडून येईल, असे ठामपणे सांगत आहेत. तर तिकडे उमेदवारांची मात्र पुरती झोपमोड झाली आहे. आज शनिवार(दि. २३) निकाल लागणार असला तरी, नागरिकांच्या चर्चानी मात्र निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

.       १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान पार पडले. “न भुतो न भविष्यती’ अशा पद्धतीने यावेळची निवडणूक होती. प्रथमच सहा पक्ष मैदानात असल्याने मतदारांसमोर मोठा पेच तयार झाला होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत एकाच पक्षात असलेली मंडळी यावेळी विभागली गेल्याने, मतदारांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अशात मतदारराजाने कोणाच्या बाजूने आपला कौल दिला याची प्रचंड उत्सुकता लागून आहे.

.      आज शनिवारी (दि. २३) मतमोजणी असून, उमेदवारांमध्ये प्रचंड धाकधूक बघावयास मिळत आहे. सर्वच प्रमुख उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी, निकाला अंतीच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. काही उमेदवारांनी विजयाचा गुलाल तयार ठेवला असून, काही मात्र ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहेत. नागरिकांच्या चर्चेचाही उमेदवारांकडून कानोसा घेतला जात आहे. तर काहि उमेदवारान कडून पैसे वाटपाचा जोर असल्याने नेमका मतदार कौल विकासाकडे का पैसाकडे देणार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 आमदारकीचा कौल कुणाला ?                                                                                                                                                             मतदान पार पडताच गावागावांत, चौकाचौकांत ‘कौल कुणाला?’ याची चर्चा होत आहे. तर नागरिक घोळक्याने एकत्र येत मतांची आकडेमोड करीत आहेत. जातीपातीची मते कुणाला भेटू शकतात यावरूनही अंदाज बांधले जात आहेत. याशिवाय उमेदवाराच्या जमेच्या बाजू तसेच नकारात्मक बाजूंवरही जोरदार विचार मंथन होत असल्याने, कौल कुणाला मिळणार याचा नागरिकांकडून व्यक्त होत असलेला अंदाज उमेदवारांचे मात्र टेन्शन बाढविणारा ठरत आहे.

error: Content is protected !!