Home सामाजिक आज उमेदवारांचे उघडणार भाग्य !

आज उमेदवारांचे उघडणार भाग्य !

1309

मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज !

Ø चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 28 तर बल्लारपूरमध्ये 27 फेर्‍या

चंद्रपूर : आज शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.

.      महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत.

विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या                                                                                                                                    70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे. 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि 7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि 6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि 10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत.

टक्केवारी वाढली : महिला मतदाराचा कल कुणाकडे                                                                                                                      चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला असून यावेळी सर्वात अधिक महिला मतदाराची संख्या वाढली. या महिला मतदाराचा कल कुणाकडे वाढणार व तो कोणासाठी लाभदायी ठरणार हे मात्र आज च्या निकाला नंतर स्पस्ट होणार आहे तर चिमूर व ब्रम्हपुरी या दोन मतदारसंघांत अनुक्रमे ८१.७५ टक्के व ८०.५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये चिमूरमध्ये ७५.१, तर ब्रम्हपुरीत ७१.५३ टक्के मतदान झाले होते. बल्लारपूर व वरोरा या दोन मतदारसंघांत अनुक्रमे ६९.७ व ६९.४८ टक्के मतदान झाले. येथे २०१९ मध्ये ६२.५३ आणि ६२.७८ टक्के मतदान झाले होते. राजुरामध्ये ७२.७१ टक्के मतदान झाले. या एकमेव मतदारसंघात मतदानाचा टक्का केवळ १ ने वाढला आहे. चंद्रपूर या शहरी मतदारसंघात मतदारांमध्ये उदासिनता बघायला मिळाली. तर ग्रामीण मतदारात उत्साह होता येथे ५७.५८ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये या मतदारसंघात केवळ ५१.४२ टक्के मतदान झाले होते.                                                                                                                        जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला असून तो कोणासाठी लाभदायी ठरणार, याबाबत विविध तर्क लावले जात असले तरी वरोरा विधानसभेच्या निकालाकडे जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागले आहे.

या ठिकाणी होणार मतमोजणी                                                                                                                                                          राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

कर्मचा-यांचे प्रशिक्षण                                                                                                                                                                     मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

error: Content is protected !!