सिंदेवाही : माजी सैनिक केशवराव गणुजी मेहरकुरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८२ वर्षाचे होतें. केशव मेहरकुळे त्यांनीं देशसेवेच्या कर्तव्यावर (भूसुरुंग विभाग) असताना भारत विरुद्ध पाकिस्तान युद्धामध्ये यशस्वी सहभाग घेतला होता. सेवानिवृत्ती नंतर आर्डनस फॅक्टरी मध्ये उर्वरित सेवा कर्तव्य बजावले. त्याचे वडील गणुजी मेहरकुरे यांनी १९४२ च्या चिमूर क्रांती लढ्यात यशस्वी सहभाग घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगला होता.


