Home राजकीय वरोरा विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस उमेदवारात थेट लढतीची शक्यता

वरोरा विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेस उमेदवारात थेट लढतीची शक्यता

1314

वरोरा : या विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी अशा दोघांच्याही अधिकृत उमेदवारांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. बंडखोरी करणारे उमेदवार तुल्यबळ असल्याने प्रारंभी सदर मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा त्यात बदल होत असून आता या मतदारसंघातील मुख्य लढत भाजपाचे करण देवतळे आणि काँग्रेसचे प्रवीण काकडे यांच्यातच होणार असल्याचे दिसून येत आहे.

.         वरोरा विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात आहे. यात महा आघाडी तर्फे काँग्रेसचे प्रवीण काकडे, महायुतीतर्फे भाजपाचे करण देवतळे, तिसऱ्या आघाडी कडून लढणारे प्रहारचे अहेतेश्याम अली, शिवसेना (उबाठा)चे बंडखोर मुकेश जीवतोडे, भाजपा बंडखोर राजू गायकवाड आणि वंचित चे अनिल धानोरकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. यामुळे महायुती आणि महाआघाडी उमेदवारांना मत विभाजनाची भीती होती. सुरुवातीला बंडखोरी करणारे आघाडी व युतीचे उमेदवार मतदारांमध्ये चांगलेच चर्चेत आले होते. तसेच अपक्ष म्हणून लढणारे आणि बंडखोरी करणारे उमेदवार तुल्यबळ असल्याने या मतदारसंघात पंचरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात होती.

.      परंतु मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं तसा प्रचाराने चांगलाच जोर पकडलेला आहे. आणि या प्रचारात बंडखोर आणि काही अपक्ष उमेदवार मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेवटी ही लढत भाजपाचे करण देवतळे आणि काँग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या होईल असे भाकीत केले जात असताना शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे, प्रहार चे अहतेशाम अली, वंचितचे अनिल धानोरकर, भाजपा बंडखोर राजू गायकवाड हे देखील स्पर्धेत असल्याने या सर्वांना मिळणारी मते निर्णय ठरणार आहे.

error: Content is protected !!